वाळूज महानगरात दोन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – वाळूज महानगर परिसरातील क्लब जवळील तापडिया इस्टेट या उच्चभ्रू सोसायटीत मंगळवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी दोन घरे फोडून सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे दुचाकीवरून पसार होणारे तीन चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज महानगर परिसरातील अभियंता कृष्णा सोळंके हे बुधवारी कुटुंबासह माजलगाव ला गेले होते मंगळवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास सोळंके यांच्या घरातून भिंत फोडण्याचे आवाज शेजारच्यांना ऐकू आला. त्यामुळे त्यांनी सोळंके यांना मोबाईल वरून या प्रकरणाची माहिती दिली. सोळंके यांनी सोसायटीतील इतर नागरिकांना त्यांच्या घराकडे पाठवले. शेजाऱ्यांनी सोळंके यांचे घर गाठले तेव्हा त्यांना चैनल गेट उघडे दिसले तर घराचा दरवाजा आतून बंद होता त्यानंतर शेजाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे मात्र घराच्या मागच्या दाराने पसार झाले.

सोळंके बुधवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता घरातील कपाटातून दोन तोळे सोन्याची चैन, 13 ग्रॅम वजनाची गंठण, प्रत्येकी पाच ग्रॅम च्या दोन अंगठ्या, चार ग्राम चे कर्णफुले, लहान मुलांच्या पाच ग्रॅमच्या अंगठ्या रोग 50 हजार रुपये असा जवळपास सहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला चे सोळुंके यांनी सांगितले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातही घरफोडीच्या घटना –
शहरातील एन-4 भागातील पारिजात नगरातील एका ब्युटी पार्लरचे लॉक तोडून चोरट्यांनी तब्बल 1 लाख 10 हजार रोख, साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि चांदी असा एकूण 1 लाख 86 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. यामुळे या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Leave a Comment