विद्युत महावितरण कंपनीच्या कृषी संजीवनी योजनेकडे दोन लाख शेतकर्‍यांनी फिरवली पाठ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कृषी पंपाची वाढत चाललेली थकबाकी कमी करण्यासाठी महावितरण कंपनीकडून कृषी संजीवनी योजना राबविण्यात आली. शेतकर्‍यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्तीसाठी जुन्या थकबाकीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली होती. जिल्ह्यात दोन लाख 40 हजार कृषीपंप ग्राहक आहेत, त्यापैकी केवळ 36 हजार 795 शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख शेतकर्‍यांनी योजनेकडे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले.

महावितरण कंपनीकडून सर्व वर्गातील वीजबिलांच्या वसुलीवर जोर धरला आहे. महावितरणच्या कृषीधोरण 2020 नुसार सांगली जिल्ह्यात सप्टेंबरअखेर 2 लक्ष 40 हजार कृषी पंप ग्राहकांकडे निर्लेखन, व्याज व विलंब आकारातील 230 कोटी रुपये माफीनंतर 1 हजार 22 कोटी सुधारित वीज बिल थकबाकी होती.

31 मार्च 2022 अखेर सांगली जिल्ह्यातील 36 हजार 795 कृषी ग्राहकांनी थकीत 141.56 कोटींपैकी 70.82 कोटी रुपये थकबाकी भरणा करून 70.82 कोटी रुपये इतकी 50 टक्केची माफी मिळवून वीज बिल कोरे केले आहे. महावितरणने योजनेत सहभागी होणार्‍या थकबाकीदार शेतकर्‍यांना महावितरणकडून वीज बिलांच्या तत्काळ दुरुस्तीसह सर्व प्रकारचे कार्यालयीन सहकार्य जलदगतीने देण्यासाठी विशेष मोहिमाही राबवल्या. तरीही प्रतिसाद मिळाला नाही.

Leave a Comment