व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भारत जोडो यात्रेतील दोघांना ट्रकची जोरदार धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातून भारत जोडो यात्रा काढली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील नवीन मोंढा परिसरात राहुल गांधी यांची काल रात्री सभा पार पडली. या सभेनंतर भारत यात्री महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाले. यावेळी यात्रींमधील दोघांना ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास राहुल गांधी यांची सभा पाहण्यासाठी यात्रेतील गणेशन (वय 62) आणि सययुल (वय 30) हे यात्रेकरू सहभागी झाले होते. सभा संपल्यानंतर ते परत निघाले असता त्यांना ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकने धडक दिल्याचे पाहता परिसरातील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गणेशन याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. तर सययुल याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत जखमी असलेल्या यात्रीची विचारपूस केली. रात्री 12:30 वाजेपर्यंत अशोक चव्हाण हे रुग्णालयात होते. परंतु, डोक्याला जबर दुखापत झालेल्या गणेशन या यात्रेकरूला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील गुरुवार हा चौथा दिवस होता. नवीन मोंढा परिसरात आयोजित जाहीर सभेनंतर भारत यात्री महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाले. त्यावेळी रात्री 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास महादेव पिंपळगाव परिसरात नांदेड-अकोला महामार्गावर पायी चालणाऱ्या तामिळनाडू राज्यातील गणेशन आणि सययुल या 2 यात्रेकरुना आयचरने धडक दिली.