हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून जगभर पसरलेल्या ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने देशातही हातपाय पसरले असून महाराष्ट्रात ओमीक्रोन ची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यातच भर म्हणून आज औरंगाबाद येथील दोघाना ओमायक्राॅनची लागण झाली असून संबंधित रुग्ण हे इंग्लंड आणि दुबई वरून आल्याचे समजते.
लग्नसमारंभासाठी लंडनहून एक कुटुंब मुंबईत दाखल झाले होते. यातील तरुणीला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे मुंबईतच निदान झाले होते. त्यामुळे तिच्यावर तिथेच उपचार सुरु होते. मात्र कुटुंबातील वडील, आई आणि बहीण औरंगाबादेत होते. यातील वडिलांचा अहवाल सात दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. तर दुबईहून आलेल्या आणखी एका रुग्णाचाही अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, एका रुग्णावर खासगी रुग्णालयात तर एका रुग्णावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असून या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना विलगीकरण कक्षात उपचार दिले जात आहेत.