पुण्यातील ओशो आश्रममधील दोन भूखंड विक्रीला; ‘या’ उद्योजकाने 107 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याचा मांडला प्रस्ताव

पुणे | पुण्यातील ओशो रजनीश यांचे आश्रम नेहमीच वेगवेगळया कारणाने चर्चेत असते. या वेळीही आश्रम चर्चेमध्ये आहे. कारण, ओशो आश्रमाने आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले आहेत. या निर्णयामुळे ओशो भक्तांना आणि अनुयायांना मोठा संताप व्यक्त केला असून, याबाबत वेगवेगळ्या भागातून विरोध व्यक्त केला जातो आहे.

पुण्यामध्ये ओशो रजनीश यांचे योग आणि ध्यान साठी जगभरात प्रसिद्ध असलेले आश्रम आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे 18 एकर परिसरामध्ये हे आश्रम आहे. या आश्रमाची मालकी झुरीच येथील ओशो इंटरनॅशल फाउंडेशन यांच्याकडे आहे. Covid-19 मुळे ओशो आश्रम गेल्या मार्च पासून बंद आहे. त्यामुळे आश्रमाची देखभाल करण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे, भूखंड विक्रीला काढले असल्याचे आश्रमाच्या अर्जामध्ये लीहाले आहे. या भूखंडाला विकत घेण्यासाठी बजाज ऑटोचे सर्वेसर्वा राजीव बजाज यांनी 107 कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यातील 50 कोटी अश्रमाने घेतले असल्याचे बोलले जात आहे.

आश्रमाचे भूखंड विक्रीसाठी शासनाची परवानगी मिळावी यासाठी अश्रमाने राज्याचे धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज केला आहे. दरम्यान, आश्रमातील भूखंड विकून आश्रम बंद करण्याची भविष्यातील योजना असल्याचे आश्रमातील भक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. समाजातून होत असलेल्या विरोधामुळे शासनाकडून हे भूखंड विक्रीसाठी परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला जाईल का, याबाबत चर्चा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.