बुलढाण्यात चोरटयांनी महिलेची नजर चुकवत 98 हजारांचे दागिने केले लंपास

0
377
theft
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाण्यातील खामगावमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात दोन चोरट्यांनी दुकानदार महिलेची नजर चुकवत जवळजवळ 98 हजारांचे दागिने लंपास (theft) केले आहेत. हि संपूर्ण चोरीची घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या आरोपी चोरांनी (theft) दुकानात शिरून दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवलं. यावेळी त्यांनी बोलण्यात गुंतवून महिलेला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दाखवण्यास सांगितले.

यादरम्यान त्यांनी संधी साधून दुकानातील काही दागिने चोरले (theft). यानंतर ते काहीच दागिने न घेता त्या ठिकाणाहून निघून गेले. आरोपी पळून गेल्यानंतर चोरी झाल्याचे दुकानदार महिलेचा लक्षात आले. हि चोरीची (theft) घटना खामगावच्या सती ज्वलर्समध्ये घडली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या दुकानदार महिलेच्या हि गोष्ट लक्षात येताच त्यांनी दुकानात लावलेले CCTV कॅमेरे तपासले. तर त्यामध्ये सोन्याचे दागिने चोरतांना (theft) हे 2 चोर आढळून आले. यानंतर या महिलेने शहर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस दुकानातील CCTVच्या आधारावरून आरोपी चोरट्यांचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!