आधार कार्डमध्ये ‘या’ दोन गोष्टी फक्त एकदाच अपडेट कराव्यात, असे का हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भाड्याने राहत असल्यामुळे किंवा नोकरीत बदली झाल्यामुळे बहुतेक लोकं आपल्या आधार कार्डमधील पत्ता बदलत राहतात, पत्ता किंवा फोटो बदलणे ठीक आहे मात्र दोन गोष्टी सारख्या बदलता येत नाहीत. त्या फक्त एकदाच बदलल्या पाहिजेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया – UIDAI नुसार, जेव्हा या दोन गोष्टी बदलल्या जातात तेव्हा त्या सावधगिरीने बदला, अन्यथा नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

आधार कार्डमध्ये जी गोष्ट वारंवार बदलता येत नाही ती म्हणजे जन्मतारीख. ती पुन्हा पुन्हा बदलता येत नाही. त्यामुळे जर आधारमध्ये आपली जन्मतारीख चुकली असेल आणि आपण ती बदलणार असाल तर हे निश्चितपणे लक्षात ठेवा की, ती जन्मतारीखच अपडेट करावी जी बरोबर असेल. कारण काही लोकांच्या आधार कार्डमध्ये पहिले कोणतीही जन्मतारीख टाकली जाते आणि नंतर नर्सरीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ती शाळेनुसार बदलली जाते. यानंतर, 10 वीच्या बोर्डसाठी ती पुन्हा बदलण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती बदलता येत नाही. म्हणून, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे बदला.

त्याच वेळी, दुसरी गोष्ट म्हणजे नाव, ते काळजीपूर्वक अपडेट करा. कारण नाव देखील पुन्हा पुन्हा बदलता येत नाही. आधार कार्ड बनवताना काही लोकांची नावे शॉर्टमध्ये टाकली जातात. जे नंतर सुधारण्यासाठी अपडेट करायला जातात. यावेळी स्‍पेलिंगकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते आणि नंतर जेव्हा गरज भासते तेव्हा नाव अपडेट करायला गेल्यास ते बरोबर मिळत नाही. म्हणूनच आपल्या सर्व कागदपत्रांमध्ये असेल त्याप्रमाणेच येथेहीआपले नाव अपडेट करावे. UIDAI नुसार, नाव आणि जन्मतारखेत चूक होऊ शकते मात्र ती पुन्हा पुन्हा अपडेट करता येत नाही.

Leave a Comment