राज्यात ओमिक्रॉनचे संकट : शाळा सुरु होण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी दिली “ही” महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची चिंताही वाढली आहे. राज्यात बघता बघता ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या हि 8 वर गेली आहे. अशात मुंबई आणि पुणे या ठिकाणी शाळा सुरु होणार का? असा प्रश्न पालकाना पडला असून शाळा सुरु होण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “मुंबई-पुण्यातील परिस्थिती पाहूनच शाळांचा निर्णय घेतला जाणार असून याबाबात टास्क फोर्सशी चर्चा करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यात वाढत असलेल्या ओमिक्रोन संदर्भात आमचे बारीक लक्ष आहे. स्थानिक पातळीवरती जो काही आहे तो निर्णय घेतला जाईल. मात्र, त्यापूर्वी टास्क फोर्सशी आम्ही चर्चा करणार आहोत. आम्ही शाळा सुरु करण्याबाबत जी नियमावली तयार केली आहे. ती आम्ही टास्क फोर्सशी चर्चा केली आहे. त्यांनाही आमची नियमावली पाठवली आहे. त्यांनीही सर्व नियमावली पडताळून पाहिली आहे.

राज्यात ओमिक्रोनचे वाढत असलेले संकट पाहता आम्ही सर्वोतोपरी खबरदारी घेत आहोत. टास्क फोर्सची आम्ही वारंवार चर्चा करीत आहोत. राज्यात मुंबई व पुण्यात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शाळा सुरु करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या संदर्भात लवकर आमही निर्णय घेऊ, असेही गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Comment