कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते होणारच होतं; राणेंकडून समर्थन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य करत गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते आज न उद्या होणारच होतं. जे कोणी हे केलं मी त्यांचं अभिनंदन करतो. आमच्या राजघराण्याबद्दल बोलताना औकदित रहायचं अस ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही संभाजी ब्रिगेडच्या कृत्याच समर्थन केले आहे. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिलं असेल, असं दरेकर म्हणाले.