सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटयातील घरफोडी उघडकीस आणून सापळा रचून दोन महिला जेरंबद केल्या.हेमा धर्मु चव्हाण व नंदा रमेश चव्हाण अशी त्या दोन चोरट्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 44 हजार 080 रूपये किंमतीच्यासोन्याचे दागिन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घरफोडी जबरी चोरी, मोटारसायकल चोरी या गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी यांना चेक करुन त्याचेकडून गुन्हे उघड करण्यासाठी एक खास पथक तयार केले.
०९ डिसेंबर रोजी विट्यातील शाहुनगर येथे अज्ञात इसमांनी बंद घर फोडून सोन्या- चांदीचे दागिणे चोरी केल्याबाबत तृप्ती लिमये यांनी तक्रार दिली होती. रेकॉर्डवरील आरोपीची माहिती घेत असताना दोन महिला या चोरीचे सोने विक्री करण्यासाठी सांगली येथील सराफ कट्टा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नागोबा मंदिर चौकामध्ये दोन महिला संशयितरित्या घुटमळताना दिसल्या. त्यामुळे त्या दोघीचा संशय आल्याने त्यांना महिला पोलीसांच्या मदतीने थांबवून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी शाहुनगर विटा येथुन आम्ही दोघींनी एक बंद असले राहते घरात रात्रीच्यावेळी घर फोडून चोरी केले असल्याची कबुली दिली.
त्यांच्या कब्जात सोन्याचे दागिने 1 लाख 44 हजार 080 रूपये किंमतीचा मुद्देमाल व 2 किलो 180 ग्राम चांदीचे ताटे, पुजेचे साहित्य विशाल जवळे यास विकले असल्याचे सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’