औरंगाबाद – भररस्त्यावर गाडी अडवून 300 रुपयांची मागणी केली. ड्युटीवरून घरी परतत असलेल्या दुचाकीस्वाराने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर पोस्ट ऑफिस रस्त्यावर घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, तुकाराम बाजीराव देशमुख (वय-59 वर्षे, रा. शिवाजी नगर, औरंगाबाद) हे 23 जानेवारी रोजी सायंकाळी 05.15 वाजेच्या सुमारास ड्युटीवरून मोटरसायकलने घरी परतत असताना पोस्ट ऑफीस शिवाजीनगर येथे चार अनोळखी 16 ते 20 वर्षे वयोयगटातिल मुले थांबलेले होते. त्या मुलांनी तुकाराम बाजीराव देशमुख येत असल्याचे पाहिले. त्या मुलांनी तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या गाडीच्या समोर येऊन गाडी अडवली. ते अनोळखी मुले गाडीसमोर आल्याने तुकाराम बाजीराव देशमुख यांनी गाडी.उभी केली. त्यापैकी एक अनोळखी मुलगा तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या समोर आला व मला म्हणाला 300 रु द्या. पैसे देण्यास तुकाराम बाजीराव देशमुख यांनी नकार दिला. तो मुलगा तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या पाठीमागे गेला तेथील दगड उचलुन तुकाराम बाजीराव देशमुख यांना फेकून मारला. त्यामुळे तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या डोक्याच्या उजव्या बाजुला लागून डोके फुटले. तितक्यात तुकाराम बाजीराव देशमुख गाडीवरुन खाली उतरत असताना त्या मुलाने पुन्हा दुसरा दगड उचलला व त्यांना फेकून मारला. त्यामुळे तुकाराम बाजीराव देशमुख यांचे डोके फुटले व कानाला मार लागला. रक्तस्राव वाढल्याने तुकाराम बाजीराव देशमुख यांनी गाडी घटनास्थळावरच सोडून जवळच असलेले घर धावत पळत गाठले.
घडलेला प्रकार मोठा मुलगा अमोल तुकाराम देशमुख यास सांगितला. त्यानंतर मुलाने तुकाराम बाजीराव देशमुख यांना हेडगेवार हॉस्पिटलमध्ये उपचारकामी घेऊन गेला. तेथे तुकाराम बाजीराव देशमुख यांच्या डोक्यातील जखमेवर उपचार करून 11 टाके दिले. उपचारानंतर तुकाराम बाजीराव देशमुख यांनी पुंडलीक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अनोळखी युवकावर पुंडलीक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.