U-19 World Cup: अवघ्या २९ चेंडूत टीम इंडियाने मिळवला विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जपानविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघे २९ चेंडू खेळत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करत जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनी अत्यंत सहजपणे पार केले.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अगदी सार्थ ठरवला. भारताच्या रवि बिश्नोई, कार्तिक त्यागी, आकाश सिंग आणि विद्याधर पाटील या चौघांच्या भेदक गोलंदाजीपुढे जपानचा संपूर्ण संघ डाव ४१ धावांत गारद झाला. या सामन्यात जपानच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. निम्मा संघ तर शून्यावर बाद झाला.

 

शू नोगुची आणि केन्तु डोबेल या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी ७ धावा केल्या. भारताकडून रवि बिश्नोईने ४, कार्तिक त्यागीने ३, आकाश सिंगने २ आणि विद्याधर पाटीलने १ बळी टिपला.४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने धमाकेदार खेळी केली. त्याने १८ चेंडूत नाबाद २९ धावा कुटल्या. यशस्वीने फलंदाजी करताना ५ चौकार आणि १ षटकार लागले. त्याला कुमार कुशाग्र याने चांगली साथ दिली. कुमारने ११ चेंडूच नाबाद १३ धावा केल्या. त्यात २ चौकार होते. जपानविरूद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारताने या विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-  

मँचेस्टर युनायटेडचा गोलकीपर सर्जीओ रोमेरोच्या गाडीला भीषण अपघात; गाडीचा चुराडा, रोमेरो सुखरूप

शिखर धवन पाठोपाठ इशांत शर्माही न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर

“#केजरीवालनामहै_उसका” ट्विटरवर ट्रेंडिंगला, दिल्लीकरांकडून भाजप, काँग्रेसवर धुव्वाधार टीका

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन

 

Leave a Comment