सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील पवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ काल खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले कि, ‘सातारा शहराच्या विकासकामांमध्ये राजकारण करत असेल’ तर मी त्याला सोडणार नाही.’
साताऱ्यातील विकासकामांमध्ये राजकारण आणून ठेकेदारांना जर कोणी दमबाजी करत असेल, तर त्याला मी सोडणार नाही अशा शब्दात त्यांनी दम दिला आहे. ‘माझं तिकीट मी आधीच काढलाय, तिकीट एकाच असते. जो जन्माला आला, त्याच.माझं तिकीट आत्ताच काढू नका, लोकांची सेवा करायची संधी मला द्या.’असे गमतीशीर उत्तर राष्ट्रवादीच्या तिकिटाबाबत विचारणा केलेलं असता उदयनराजे यांनी दिले.
भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंनी काहीच उत्तर दिले नाही. उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले