बेवकूफ… रेस का सिंकदर मैं हूं! छ. उदयनराजेंचा हटके अंदाज पुन्हा चर्चेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिस रेस से ये मुझे निकालने की ये बात कर रहे है ये बेवकूफ, ये नही जानते उस रेस का सिंकदर मैं हूं, हा डायलाॅग रेस थ्री मध्ये चांगलाच गाजला होता. याच डायलाॅगची भुरळ छ. शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज राज्यसभा खा. छ. उदयनराजे भोसले यांनाही पडली. नेहमीच आपल्या हटक्या स्टाईलसाठी प्रसिध्द असलेले छ. उदयनराजे यांच्या या डाॅयलाॅगचीही हवा होणार हे नक्की.

अभिनेता सलमान खान आणि जैकलिन फर्नांडिस यांच्या भूमिका असलेल्या रेस थ्री या चित्रपटातील हा डायलाॅग आहे. जलमंदिर सातारा येथे छ. उदयनराजे भोसले यांच्या चारचाकी बीएमडब्यू गाडी (क्र. एमएच- 11- डीडी- 007) मध्ये एका चाहत्याने व्हिडिओ शूट केला आहे. यावेळी उदयनराजे यांची हटके स्टाईल पहायला मिळाली आहे.

जलमंदिरमधून बाहेर पडताना देखी सारी दुनिया, देखे दुनियावाले हे गाणे गाडीत लावलेले होते. नेहमीच काहीतरी वेगळे व हटके स्टाईलसाठी प्रसिध्द असलेले छ. उदयनराजे यांनी जिस रेस से ये मुझे निकालने की ये बात कर रहे है ये बेवकूफ, ये नही जानते उस रेस का सिंकदर मैं हूं, हा डायलाॅग रेस थ्री मधील डायलाॅग म्हणतं नक्की कोणाला बरं आव्हान देत असतील? असा सवाल आता उपस्थित केला जावू शकतो.