उदयनराजे यांचे स्टंट म्हणजे वाऱ्यावरची वरात : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खा.उदयनराजे भोसले यांनी गाडीवर बसून हवेतून येण्याचा केलेला स्टंट म्हणजे वाऱ्यावरची वरात असल्याची टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. खा. उदयनराजे यांची सर्व कामे ही नुसती वाऱ्यावरची असतात. त्यामुळे ते असले स्टंट ते करू शकतात. आपल्याला मात्र असलं काही हवेतल जमणार नसल्याची खोचक टीका देखील साताऱ्यातील एका कार्यक्रमात केली.

सातारा येथे श्री सुवर्ण गणेश नागरी सहकारी पंतसंस्थेच्या 16 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीच्या आधी सहा महिन्यात कामे वाऱ्यावरती दाखवायची. परवा काही आपण स्टंट बघितले, ते वाऱ्यावरचे प्रकार आहे. कारण यांची सगळी कामे वाऱ्यावरती आहेत, जमीनीवरती काही नाहीत. आम्ही आपली स्वतःच्या पैशाने गाडी घेतली आहे, त्यामुळे रस्त्यावरच चालवत असतो.

साताऱ्यात काही दिवसावर सातारा नगरपालिकेची निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. त्या अगोदर दोन्ही राजे एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चला हवा येऊ द्या कार्यक्रमात बाईकवरून हवेतून एंन्ट्री केली होती. त्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खोचक टीका केली आहे.