Friday, June 2, 2023

उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना ओपन चॅलेंज; चर्चेला यायचं असेल तर..

सातारा : नगर पालिकेच्या नूतन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना चर्चेला येण्याचे आवाहन दिले आहे.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले. आम्हाला नारळफोडी गॅंग असा उल्लेख केला असला तरी आम्ही कामे केली म्हणून नारळ फोडतो. एखाद्याच संपूर्ण घरदार उध्वस्त केलं नाही. असे सांगत चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे कधीही तयार आहे. मात्र धाडस पाहिजे असे प्रतिआवाहन दिले आहे.

कारण नसताना लहान मुलांसारखी वैयक्तिक टीका आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडून सुरू आहे.. यावेळी खासदार उदयनराजेंनी व्यासपीठावर “काय बाई सांगू? कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज” हे गायले गायले.. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.