पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर पलटी; हायवेवर ऊस पसरल्याने वाहतुक ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये महामार्गाच्या रेलिंग तोडून ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कराडनजीक भोसले कृषी उद्योग केंद्रानजीक ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर महामार्गाचे रेलिंग तोडून पलटी झाला आहे.

या भीषण अपघातातमुळे उपमार्ग ठप्प झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर ट्रॉलीची पहिली ट्रॉली पलटी झाल्यामुळे मार्गावर ऊस सर्वत्र पसरला आहे.

घटनेची माहिती मिळताच मदत कार्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी पोलिस पाठवले असून उपमार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान महामार्ग पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Comment