दिल्ली | भाजपने राज्यसभेसाठी आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रि.पा.इं. नेते रामसाद आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या कोट्यातील सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होणार आहे.
भाजपकडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर#hellomaharashtra @Chh_Udayanraje @RamdasAthawale @BJP4Maharashtra pic.twitter.com/eYaxTuTKJa
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 11, 2020
उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र भाजप तिसरी उमेदवारी कोणाला देणार हा सस्पेंस अद्याप कायम आहे. एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते अशीही चर्चा आहे.
दरम्यान महाराष्ट्राच्या कोट्यातून निवडून द्यावयाच्या एकुण सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होणार आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन तर महाविकासआघाडीच्या वाटेला एकुण चार जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना, काँग्रेस यांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.