सातारा प्रतिनिधी ।शुभम बोडके
राज्यसरकारचे कौतुक बास, जेवढं कराव तेवढं थोडचं आहे. कोण, काय करत ते लोक जाणतं. तुमचे वकील उपस्थित राहत नाही. सुप्रीम कोर्ट आहे, तेथील तारखा एक दिवसाआड मिळत नाही. कोर्टाने दिलेल्या तारखेला तुम्ही म्हणता तयारी झाली नाही. मग श्वेतपत्रिका आणा. काय दिवे लावले ते कळूद्या. आरक्षणाचा मुद्दा राज्याचा आहे, तुम्ही केंद्रावर ढकलताय. आता विष मी पिणार नाही तर त्यानांच पाजणार असल्याचे वक्तव्य राज्यसभेचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे. सातारा येथे मराठा आरक्षण विषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, यापुढचा मार्ग माझ्या हातात काही राहिले नाही. लोकांचा उद्रेक होईल, कापतील लोक, लोकांनी निवडून दिले, त्यांना सांगा काय केल. सांगा त्यांना आम्हांला तुम्हाला ठेचायच होत. यांना मुक बधिर शाळेत नाहीतर मेन्टल हॉस्पीटलमध्ये टाका. आता विष मी पिणार नाही, तर त्यानांच पाजणार. मी का आत्महत्या करू ज्याच्यामुळे आमच्यावर आत्याचार होतात. या लोकांनी वाट लावली ना मग यांचीच वाट लावून टाकाना. नॅक्सेल निर्माण करणारे हेच लोक आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडूण दिले. जगात जात नसती. तर निम्याच्यावर भांडण झाली नसती. शरद पवार, उध्दव ठाकरे यांची भेट घेतली मात्र त्यांचा काहीच उपयोग झाला नाही.
अजित पवार यांनी छ. उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी राज्यसभेत बोलावे या वाक्तव्यावर छ. उदयनराजे म्हणाले, हा विषय राज्याचा आहे, तुम्ही केंद्रावर ढकलताय. तुम्ही काय केल ते सांगा. तुम्ही स्वताःला तज्ञ समजता तर सांगा ना आणि श्वेतपत्रीका काढाना. सध्याचे सरकारबाबत मी क्रक झालोय. सगळे ते तज्ञ आहेत. गाडा पुढे ढकलायचे सुरू आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा