सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आरक्षण ठेवायचं असेल तर ठेवाना आर्मी, नेव्ही, एअरपोर्समध्ये ठेवाना. तेथे कोण जाते एक तर मराठा, रजपूत, सीख बॉर्डरवर असतात. आज हे सगळे म्हणाले राहूद्या आपल्या कुटुबांवर अन्याय होत आहे आणि बॉर्डर सोडली तर काय होईल. सगळ्या गोष्टी पैशावर अंवलबून नसतात. जशी बेकारी वाढणार तशा या गोष्टी होणार. आता मराठा आरक्षणावर केवळ रक्तपात हा एवढा एकच मार्ग आहे, आणि तो होणारच असे स्फोटक वक्तव्य राज्यसभेचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे. सातारा येथे मराठा आरक्षण विषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांनी खासदार उदयनराजे भोसले यांना मराठा अरक्षणावर मार्ग काय प्रश्न विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, मी विष पिणार असे म्हटले नाही तर त्यापलीकडची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा कुटुंबात मी जन्मलो म्हणून नाही तर वाटत प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजेत, मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मग मराठ्यांना न्याय का नाही.
आज 2300 मुलांचा प्रश्न आहे. त्याचा टाईमपेरेड पुढे गेला.ज्या मुलांनी परिक्षा दिल्या, त्यांना फस्ट्रेक्शन येणार नाही का ? यापूर्वी 40 लोकांनी आत्महत्या केल्या. आता किती करतील ते सांगता येत नाही. सत्तेत बसणार्यांना ज्या भावनेने निवडून दिले, त्यांनी आता न्याय द्यावा. सध्या राजकाराण नाही तर गचकरण झाले आहे. आता मतदारचजागा जागा दाखवतील.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा