रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते, राज्यपालांनी वक्तव्य मागे घ्यावे- उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे 13 वे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती उदयनराजे यांनी देखील राज्यपालांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे अस म्हंटल आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकिचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/2296328373839659

राज्यपाल नेमकं काय म्हणाले-

औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार ?? असे विधान त्यांनी केलं. तसेच गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही असा दावाही राज्यपालांनी केला

Leave a Comment