साताऱ्यात खासदार उदयनराजेंचा आणखी एक धमाका; दुचाकीवरून विकासकामांच्या उद्घाटनाचा लावला सपाटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजपचे खासदार आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे साताऱ्यातील विविध भागातील विकास कामाचे उद्घाटनाचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंनी आपल्या अनोख्या स्टाईल म्हणजेच ॲक्टिवा दुचाकी वरून स्वतः गाडी चालवत उद्घाटन केल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे.

आपल्या अनोख्या अदा साठी परिचित असलेले कधी जिप्सी तर कधी ट्रॅक्टर तर कधी आणखी कुठली अशा विविध गोष्टीमुळे राजे कायम चर्चेचा विषय असतात त्यांनी आपल्या अनोखी अदा दाखवत सातारा शहरातील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी स्वतः स्वतः एक्टिवा गाडी चालवली त्या मुळे कार्यकर्त्यांची
मोठी धांदळ उडाली.

तत्पूर्वी, उदयनराजे यांनी साताऱ्यातील फुटका तलाव येथील ओपन जिम चे उदघाटन करताना स्वतः मशीन वर व्यायाम करून युवकांना व्यायाम करण्याचा अनोखा संदेश दिला. उदयनराजे भोसले यांचा तो व्हिडीओ सुद्धा जोरदार व्हायरल झाला होता.