उदयसिंह उंडाळकरांनी घेतली शरद पवारांची भेट; जिल्हा बँक, कृष्णा कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी दणका देणार?

सातारा | सातारा जिल्ह्यात आगामी काळात अनेक राजकीय निवडणूका असून जिल्ह्यात राजकीय समीकरणानी जोर धरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात भाजपने प्रवेश करत धोक्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आता आगामी राजकारणाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांच्यात मुंबई येथे झालेल्या बैठकीने खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्यातील आगामी कृष्णा कारखाना तसेच सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाची नेमकी काय भूमिका राहणार याचीच उत्सुकता लागली असतानाच ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी काही मोजक्‍या नेत्यांना सोबत घेऊन मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. कृष्णा कारखान्यासह जिल्ह बॅंकेच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांत सुमारे पाऊणतास खोलीबंद चर्चा झाली. त्यामुळे कृष्णा कारखान्यात ऍड. उदयसिंह पाटील व अविनाश मोहिते यांच्यातील एकत्रीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे.

कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक सर्वांसाठी महत्त्वाची असून कऱ्हाडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस तालुक्‍यांत कृष्णाचे कार्यक्षेत्र आहे. त्या तालुक्‍यातील राजकारणावर कारखान्याचा प्रभाव आहे. त्यामुळे या ताकदीवर काहीही करून कृष्णा कारखाना खेचायचाच यासाठी दोन्ही कॉंग्रेस कडून प्रयत्न सुरू आहेत.

कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकर एकत्र आल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यांच्या वाढलेल्या ताकदीचा थेट फायदा घेऊन अविनाश मोहिते या ताकद देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे कृष्णा सह जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादीची साथ मिळणार का यासाठी उदयसिंह उंडाळकर यांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like