हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हंटल होत की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती. परंतु उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी तयार नव्हते, ते मुख्यमंत्री व्हावेत हा माझाच आग्रह होता असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पध्दत वेगळी आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आणि तयारी नव्हती पण तेच मुख्यमंत्री व्हावेत असा माझा आग्रह होता असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच मी पुन्हा येईन अस म्हणणारे सध्या अस्वस्थ आहेत असा म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.
विरोधकांकडून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे सरकार 5 वर्ष टिकेल आणि पुन्हा एकदा सत्तेत येईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. या देशात काही यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबीचा वापर हा त्या राज्यातील विरोधात केला जात आहे. सीबीआयचा महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. सरकारला अडचणीत आणलं जात आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही हाच प्रकार सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.