सोशल मीडियावर उद्धव ठाकरे, शरद पवारांची बदनामी ; दोन जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । कराड

कराड सोशल मिडीयावर महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून दोघांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय तुलसीदास शिंदे यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजीतसिंग राणा अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील सुपने येथील रहिवासी असलेले अक्षय शिंदे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक म्हणून काम पाहतात. तसेच सचिन कुर्‍हाडे हे पक्षाच्या सोशल मिडीया सेलचे जिल्ह्याचे काम पाहतात. दि. 12, 15, 16 आणि 19 ऑक्टोबर रोजी सोशल मिडीयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट व फोटो टाकण्यात आल्याचे अक्षय शिंदे यांच्या निदर्शनास आले.

याबाबत त्यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुर्‍हाडे यांच्याकडून माहिती घेतली असता संबंधित सोशल मिडीया ग्रुप अमरावतीच्या आकाश ठाकूर नामक व्यक्तीने बनविला असल्याचे समोर आले. त्यामुळे मंगळवारी याबाबत अक्षय शिंदे यांनी आकाश ठाकूर व रणजीतसिंग राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कड तपास करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’