हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिंदे गटाकडून धनुष्यबाण आणि शिवसेनेवर हक्क सांगितला जाऊ लागला. यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण गमवावे लागेल का?? असा प्रश्न सर्वाना पडला होता. याचंबाबत आज थेट पत्रकार परिषद घेत धनुष्यबाण हा शिवसेनेचाच राहील. कायद्यानुसार शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी ठणकावले आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचेच राहणार आहे. घटनात्मक व्यक्तींचा सल्ला घेऊन मी हे ठामपणे सांगतोय अस उद्धव ठाकरे म्हणाले. धनुष्यबाण हे शिवसेनेपासून कधीही वेगळं होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला नवीन चिन्हाचा विचार करण्याची आवश्यकता नाही. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
जे शिवसेनेत गप्प होते ते आता शिंदे गटात जाऊन बोलके झाले आहेत. असा टोला त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला. माझ्या कुटुंबावर टीका झाली तेव्हा यातील कोणीच बोललं नाही. ज्यांनी आत्तापर्यंत मातोश्रीवर विकृत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. आता तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंवर आमच प्रेम आहे, आदर आहे. मग मागच्या अडीच वर्षांपासून तुमचं आमच्यावरील प्रेम कुठे गेलं होत ?? असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना केला