पुणे प्रतिनिधी | मुख्यमंत्री पदावरून सेना भाजपमध्ये चांगलेच वादळ उठलेले असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी शिवसेनेचा देखील मुख्यमंत्री आहे असे म्हणले. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची भाषाच बदली आहे. राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झालेले बघायला आवडेल असे म्हणले आहे.
भूम परांडा मंडळ पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सावंत बोलत होते. २०१४ साली उद्धव ठाकरे यांना भाजपने चक्रव्हिवात अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तसे होणार नाही. सन्मानाने युती झाली तर ठीक अन्यथा आमचा एकला चलोचा नारा राहणार आहे असे मत तानाजी सावंत यांनी व्यक्त केले आहे. सत्तेचा माज उतरवण्याची धमक शिवबंधनात आहे. उस्मानाबाद मतदारसंघातील ६ हि जागी शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार आहेत. आमच्या मित्र पक्षाने या जिल्ह्यात लुडबुड करू नये अशी तंब्बी भाजपला द्यायला तानाजी सावंत विसरले नाहीत.
मराठवाड्याच्या वाटणीचे उजनीचे पाणी बारामतीला पळवले. ते पाणी बारामतीकडून हिसकावून मराठवाड्याला मिळवून देण्याचा एक कलमी कार्यक्रम आम्ही आखला आहे. बारामतीच्या जाणत्या राजाला हि धमकी समजायची असेल तर त्यांनी ती धमकी समजावी असे म्हणून तानाजी सावंत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.