महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग फळले; ठाकरेंकडून खोचक शब्दात मोदींचे अभिनंदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धोबीपछाड देत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. भाजप तब्बल १५८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिंनदन केलं आहे, मात्र यावेळी त्यांनी महारष्ट्रातून गुजरातला पळवलेल्या उद्योगधंद्यावरून खोचक टोला लगावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. भाजपने हि निवडणूक पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवली होती त्यामुळे लोकांनी भाजपला भरगोस मतदान केलं. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. पंतप्रधान मोदी हे 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील. आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला असेही उद्धव ठाकरेंनी म्हंटल.

दरम्यान, मोदी शाह यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विधानसभेच्या १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजप तब्बल १५६ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस १७ जागांवर आघाडीवर आहे तर ज्या आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये हवा निर्माण केली होती त्या आपला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोदी फॅक्टर चालल्याचे स्पष्ट झालं आहे.