“सरकार पडलं तर फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत”, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र अजूनही हे सरकार स्थिर आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. जरी हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील शिंदे सरकार पडणार नाही याची तजवीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून ठेवली असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संभाजीनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
“देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील.कारण मुख्यंमत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरू असतात”, असे चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.

“निवडणुका कधीही लागू शकतात”
तसेच राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे मोठे विधानदेखील त्यांनी यावेळी केले. “निवडणुका कधीही लागू शकतात. राष्ट्रपती राजवटही लागू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे हे राज्यपाल कसं काम करतात. आपले १२ लोक त्यांनी घेतले नाहीत. आपलं कोणतंच काम केलं नाही”, असे म्हणत त्यांनी सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

काँग्रेसचं खोचक प्रत्युत्तर
चंद्रकांत खैरेंनी हा दावा करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेसलादेखील लक्ष्य केले. त्यांच्या या दाव्यावर काँग्रेसकडून खोचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत खैरेंच्या या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “जे आपलाच पक्ष सत्तेत असून सांभाळू शकले नाहीत, तर दुसऱ्या पक्षाविषयी त्यांनी बोलायचं कारण नाही”, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती