माझ्या भात्यातील कितीही ‘बाण’ घेऊन पळा पण धनुष्य माझ्याकडेच…: उद्धव ठाकरे

0
65
Uddhav Thackeray Shivsena letter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा सुनावले आहे. “शिवसेनेत फूट ही बंडखोरांनी पाडली नाही तर भाजपने पाडली आहे. भाजपच सेनेला संपवत आहे. मात्र, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा,” असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

उत्तर भारतीय महासंघाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “भाजप दोन कोंबड्यामध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱ्याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. पण आम्ही ठाकरे आहोत.”

“कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे. संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हे ही दिवस जातील, पुन्हा मैदानात उतरू आणि नव्याने पक्ष उभारू,” असा निर्धारही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here