आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, त्याबद्दल तुमचे…; उद्धव ठाकरेंचे भावनिक पत्र*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड करत भाजपशी युती केली. त्यांच्या बंडामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर तसेच शिवसेनेतील अनेक आमदार शिंदे गटात सहभागी होऊ लागले आहेत. अशात 15 आमदारांनी मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवले आहे. “शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केले आहे. कोणत्याही धमक्या, प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेनेसोबत राहिलात आपल्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले, असे पत्रात ठाकरेंनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरेंनी पाठवलेले पत्र आमदार वैभव नाईक यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. त्यामध्ये ठाकरेंनी म्हंटले आहे की, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे.

निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिले आहे.

Uddhav Thackeray Letter

आपण अशा परिस्थितीत कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता निष्ठेने शिवसेनेसोबत राहिला आहात. आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो. अशा सदिच्छा,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.