उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? मुलाखतीचा टिझर रिलीज, नेमका कोणाला इशारा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नवी मुलाखत (Interview) येत्या २६ आणि २७ जुलै रोजी प्रसारित होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हेच पुन्हा एकदा ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत. गेल्या वर्षभरातील एकूण राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. त्यातच आता ठाकरेंच्या या मुलाखतीचा टिझर प्रदर्शित झाला असून ते आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची उत्कंठा आणखी वाढली आहे.

मुलाखतीच्या टिझर मध्ये नेमकं काय आहे?

शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून ही मुलाखत प्रसारित होणार आहे. त्याच अकाउंट वरून याबाबतचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये आवाज कुणाचा, वर्षातील सर्वात मोठा स्फोटक आणि थेट भाग लवकरचं असं म्हणत विरोधकांना थेट इशारा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा एकमेकांसमोर बसलेला फोटो सुद्धा पाहायला मिळत आहे.

आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे |Shivsena Podcast  - Promo

उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?

उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चाललं असताना भाजपने आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवारांना फोडले. या फोडाफोडीच्या राजकारणावरून उद्धव ठाकरे भाजपवर टीका करण्याची शक्यता आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिकाही ते स्पष्ट करतील. परंतु हे सगळं असताना उद्धव ठाकरे नेमका कोणता खुलासा करणार हे पाहणे जास्त महत्वाचे ठरेल.