कोरोनाशी फाईट करण्यात उद्धव ठाकरेच Best CM! ‘या’ मुख्यमंत्र्यांना मागे टाकत मारली बाजी

0
31
cm
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशामध्ये कोरोनाने कहर केला आहे. देशातील प्रत्येक राज्य आपआपल्या परीने कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात कोणते मुख्यमंत्री सर्वात यशस्वी ठरले आहेत याबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रभु चावला यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून एक चाचणी घेतली होती. या चाचणीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वोत्तम कामगिरी करत असल्याचा निकाल आला आहे. ट्विटरवरील या चाचणी मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक 62 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे सोशल नेटवर्किंग वर सध्या शिवसेना समर्थकांकडून या पोल्सचे स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट केली होती.’ कोणते मुख्यमंत्री करोना च्या दुसऱ्या लाटेचा सर्वात प्रभावीपणे सामना करत आहेत? असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून विचारला होता. चावला यांनी दोन पोल घेतले होते. याकरिता चार पर्याय देत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे पर्याय दिले होते. यात पर्याय म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या पोल्सचे रिझल्ट आता पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विट केले आहेत. यात योगी आदित्यनाथ त्यांना 31. 6% मते मिळाली आहेत.पिनराई विजयन यांना 1.3 % तर उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक 62.5 टक्के मते मिळाली तर अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे या पोल्सच्या निकालावरून तरी कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेची परिस्थिती हाताळण्यात सर्वाधिक चांगली कामगिरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचं स्पष्ट झाले आहे.

पहिल्या पोलमध्ये दोन लाख 67 हजार 248 जणांनी आपलं मत नोंदवलं यापैकी 62.5 टक्के मते ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली म्हणजे दोन लाख 67 हजार 248 जणांपैकी एक लाख 67 हजार तीस मते उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 31. 6 तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4.6 टक्के तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना 1.3 टक्के मते मिळाली आहेत म्हणजे योगी आदित्यनाथ याना एकूण 84 हजार 450 मते मिळाली तर केजरीवाल यांना 12293 तर पिनराई विजयन यांना 3474 मतं मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here