नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशाला कोरोना महामारीने ग्रासले असताना महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्या मध्ये मात्र कडू राजकारण सध्या पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव हा चिंतेचा विषय ठरतो आहे. याच दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेचा विषय आहे का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील करोना संक्रमणाची चिंता जरूर आहे… पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करायची आहे. असं शहा यांनी म्हटलंय.दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीची जोरदार चर्चा झाली होती. मात्र शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीचे तपशील सांगण्यास अमित शहा यांनी मुलाखतीदरम्यान नकार दिला.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारला ही अपवित्र महाआघाडी आहेत असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना भारतीय जनता पक्ष सोबत विधानसभा निवडणूक लढवली होती. युतीत ते अगोदर पासूनच लहान भागीदार होते पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा हात सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केली वैचारिक दृष्ट्या हे एकमेकांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की ही अपवित्र महाआघाडी आहे. आणि आपल्या वजनानेच ती खाली पडेल. त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागणार नाही”.
रेमडिसिवीर या औषधांविषयी बोलताना अमित शहा म्हणाले की,रेमडिसिवीर हे औषध महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यात तयार होतं आम्ही उत्तर प्रदेश ऐवजी महाराष्ट्राला रेमडिसिवीर पुरवलं महाराष्ट्रात वाढत जाणारी रुग्णसंख्या चा आकडा पाहता मला त्याची चिंता समस्या पण या पद्धतीने राजकारण करणे योग्य नाही असा अमित शहा यांनी म्हटलंय.