जम्मू काश्मीर मध्ये मेहबुबा मुफ्तीसोबतची युती विसरलात का?? मुख्यमंत्र्यांनी भाजपला घेरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएम सोबत युती नाहीच अस स्पष्ट करत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला घेरले आहे. जम्मू काश्मीर मध्ये मेहबुबा मुफ्तीसोबतची युती विसरलात का?? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

भाजपचे हिंदुत्त्व हे फक्त राजकारणा साठी आहे तर आपलं हिंदुत्त्व हे देशासाठी आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत युती केली होती, याचा भाजपला विसर पडला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एक वेळ अशी होती की, ते मेहबुबा  मुफ्तीसोबत संसार करत होते. आता ते आपल्याला बोलत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला कोंडीत पकडले.

दरम्यान, एमआयएमही भाजपची बी टीम आहे. त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवून एमआयएमचा डाव उधळून टाका असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

Leave a Comment