हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमची आहे. माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, त्यांनी मध्ये चोमडेपणा करू नये असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगालाचा ठणकावले आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटासह निवडणूक आयोगावर सुद्धा निशाणा साधला.
निवडणूक आयुक्त गुलामासारखं वागत आहे. त्यांचा निकाल आम्हाला मान्य नाही. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली.भूमीपुत्रांच्या न्यायहक्क साठी शिवसेनेची स्थापना झाली. तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर येऊन पहावं शिवसेना कोणाकडे आहे अस म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला टार्गेट केलं.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका केली. तुम्ही शिवसेना नाव चोरल तरी तुमच्या कपाळावर गद्दार हाच शिक्का राहील. तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार? असा सवालही त्यांनी केला.