शिंदे RSS च्या कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? ठाकरेंचा खोचक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास आज भेट दिली आणि डॉ. हेडगेवारांना अभिवादन केलं. मात्र यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंसह भाजपला टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी गेले होते का? अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे नागपुरात (Nagpur) पत्रकार परिषदेत बोलत होते.

https://www.facebook.com/Shivsena/videos/699979738183861/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB

सध्या महाराष्ट्रात टोळीचं राज्य आहे. त्यांनी याआधीच पक्ष चोरलाय. दुसऱ्याचे वडील चोरलेत. मिंदे गट काल शिवसेना कार्यालयात गेले होते. आज आरएसएस कार्यालयात गेले. RSS च्या कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? कारण यांची नजर वाईट आहे ज्याचा अनुभव आम्ही घेतला आहे त्यामुळे आरएसएसने सावध राहावं. आज शिंदे रेशीमबागेत येऊन गेलेत. तिथे लिंबू-टाचण्या कुठे पडल्या आहेत का ते पाहावं, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची भाषा भाजप आधीपासूनच करत आहे. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी करणारे कर्नाटकचे मंत्री हे भाजपचेच आहेत. भाजपच्याच पोटातलं त्यांच्या मंत्र्यांच्या ओठावर आलेलं आहे असं म्हणत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव आहे असा थेट आरोपही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.