हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सत्तानाट्य सुरू असताना मुख्यमंत्र्यांना कोरोना झाल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
कोंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की उद्धव ठाकरे हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत.काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळाच्या बैठकिला ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.
#WATCH | Mumbai: "Maharashtra CM Uddhav Thackeray has tested positive for #COVID19," says Congress Observer for the state, Kamal Nath. pic.twitter.com/wl22yJkXXt
— ANI (@ANI) June 22, 2022
दरम्यान, आज सकाळीच राज्यपाल भगतसिंग कोशारी याना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. राज्यपालांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार होते त्यापूर्वीच कोषारीना कोरोनाची लागण झाल्याने सत्ता संघर्षाच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे.