औरंगाबाद प्रतिनिधी | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर आमच्यात आणि कॉंग्रेसच्या लोकांमध्ये फरक काय राहिला. लोकांनी आपल्याला लोकांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे याचे भान आपण ठेवले पाहीजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी येथील शेतकऱ्याना कर्ज माफी मिळाली का याबद्दल विचारले. त्याच प्रमाणे पिक विम्याचे पैसे तुमच्या तुमच्या खात्यावर जमा झाले का ते विचारले. तेव्हा शेतकऱ्यांनीनाही असे उत्तर दिले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपण जर जनतेची कामे केली नाहीत तर आपल्यात आणि कॉंग्रेसमध्ये फरक काय असा सवाल सरकारला विचारला.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप विरोधी वक्तव्यांना सूक्ष्म स्वरुपात सुरुवात केली आहे. सेना भाजपमध्ये आगामी मुख्यमंत्री कोण होणार यावर शीत युद्धाचा प्रारंभ झाला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे आहे आणि भाजप त्यांना ते पद देण्यास तयार नाही. त्यामुळे भाजप आणि सेना यांच्या वादावर नेमका काय तोडगा निघणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.