हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच बारसुच्या जागेसाठी पत्र लिहिलं असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी यावर प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. होय, मीच ते पत्र लिहिले, पण दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला.
भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी बारसु रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, पण अडीच वर्षात मी पोलिसांच्या बळाचा वापर करून तो प्रकल्प का राबवला नाही? मी राज्याच्या मुळावर येणारे विषय अडवले म्हणून सरकार पाडलं.
तुम्ही जर उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? आरेचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? असे एकामागून एक सवाल ठाकरेंनी केले. बारसू आणि नाणारबाबतची जी भूमिका होती ती माझी नव्हती ती तिथल्या लोकांची होती असेही त्यांनी म्हंटल. ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गासारखा विषय सोडवला त्याप्रमाणे रिफायनरीचा विषय का सोडवला जात नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी सरकारला केला.