हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाविकास आघाडीतून जागा वाटपाचे अनेक फॉर्मुले समोर येत असताना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एक मोठे वक्तव्यं केले आहे. पत्रकार परिषद बोलताना, “आमच्या महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळित होईल. राष्ट्रवादी आणि आमची व्यवस्थित बोलणी सुरू आहे. जवळपास ही बोलणी झाली आहे” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
विरोधकांना टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले की, “यांना कुणीतरी सांगितलं आहे की, 30 एप्रिलपर्यंत निकाल लागला तर तुमचं काहीतरी ठीक होईल. असं कुणीतरी सांगितल्याचं माझ्या कानावर आलं. आमच्या महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळित होईल. राष्ट्रवादी आणि आमची व्यवस्थित बोलणी सुरू आहे. जवळपास ही बोलणी झाली आहे”
वंचित आघाडीबाबत वक्तव्य
त्याचबरोबर, “इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक झाली. तेव्हा काँग्रेसशी बोलणी झाली आहेत. मी स्वत: मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी बोललो आहे. पुढे काही दिवसात दिल्ली आमची पुन्हा बैठक होईल. तसेच, वंचितबरोबर सुद्धा आमची बोलणी सुरु आहे. येत्या दोन दिवसात संजय राऊत- ठाकरे गटाचे दोन नेते आणि वंचितच्या नेत्यांमध्ये बोलणी होईल. आमची एकत्र बैठक होईल” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर भाषण
दरम्यान, पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या बाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “राम मंदिराचं राजकारण होऊ नये. भाजपने राम मंदिराच्या उद्घाटनाचा इव्हेंट केला आहे. 22 जानेवारीलाच अयोध्येत दर्शनाला जायला हवं, असं काही नाही. राम मंदिर नव्हतं तेव्हा पूजा सुरूच होती. राम मंदिर नसतानाही आम्ही अयोध्येत गेलो. लाखो भाविकही अयोध्येत जात होते. माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येला जाईल”