हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांसोबत आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे मोठे विधान केले. त्यानंतर कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबईत शिवसेना भवनात पार पडलेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहावे.
शरद पवारांचा नादच खुळा!! हॉस्पिटलमधून थेट राष्ट्रवादीच्या शिबिरात पोचले
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/YpumkMXYnf#sharadpawar #hellomaharashtra @PawarSpeaks
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 5, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात, असे शेवटी ठाकरे यांनी म्हंटले.