हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना व राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही काल सर्व आमदारांना व्हीप जरी करत हजर राहण्याचे आदेशही दिले तर शिंदे यांच्यावर कारवाई करताना ठाकरेंनी त्यांच्याकडून विधान परिषदेतील गटनेते पद काढून घेत त्यांच्या जागी अजय चौधरींची नेमणूक केली. मात्र, ही नेमणूक बेकायदा असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. यावर आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी चौधरींच्या गटनेतेपदी नेमणुकीला मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता उद्धव ठाकरेंनी टाकलेला पहिला डाव यशस्वी ठरला आहे.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या आमदारांनी बंडखोरी केले आहे. त्यांच्यावर कारवाई करत प्रथम एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली. आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक केली. मात्र, काही तासाभरातच शिंदे यांनी जाधव यांची नेमणूक बेकायदेशीर असून आमच्याकडे 42 आमदारांच्या सहीचा पाठींबा आहे. त्यामुळे चौधरी यांची गटनेतेपदी निवड करू नये, अशी मागणी शिंदे यांनी केली होती.
दरम्यान, शिंदे यांनी केलेल्या मागणीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी निर्णय दिला असून कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. गटनेत्याने प्रतोदांची नेमणूक करायची असते. उद्धव ठाकरेंनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे, ते पत्र मी स्वीकारले आहे. सुनील प्रभूंनी दिलेल्या सहीचं पत्र मी स्विकारले आहे. शिंदे यांच्याकडून दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याचा दावा अद्याप आपल्याकडे आलेला नाही. तो करायचा की नाही हा प्रश्न त्यांचा आहे. माझ्याकडे दावा केला तर घटनेप्रमाणे त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही झिरवाळ यांनी सांगितले.