Wednesday, October 5, 2022

Buy now

कराडात अजित दादांच्या सोबत 2 दिग्गज राजकीय नेत्यांची कमराबंद गुफ्तगू : राजकीय चर्चांना उधाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी सायंकाळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील घरी स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. यावेळी अजित दादांच्या सोबत दोन राजकीय नेत्यांनी कमराबंद चर्चा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे पूर्वीचे विश्वासू सहकारी व सध्या भाजपचे डॉ ‌‌अतुल भोसले यांच्यासोबत असलेले विधानपरिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील यांनी अजित पवार यांचे स्वागत करून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल ्च्छा््च्छा्च्छा््च्छ शुभेच्छा दिल्या.. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व माजी आमदार आनंदराव पाटील यांची सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली

सध्या भाजपसोबत असलेले माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या या भेटीमुळे भोसले गटाची भूमिका काय राही, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वपूर्ण असल्याने कराड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणती रणनीती ठरणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच नक्की या कमराबंद भेटीत काय चर्चा झाली, याबाबत तालुक्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.