सत्तास्थापनेमुळं उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर!

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । सर्वांचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नियोजित अयोध्या दौरा लांबीवर पडला आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याकारणाने त्यांनी आपला दौरा पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे. दौऱ्याची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अयोध्या प्रकरणी आपला अंतिम निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निकालाचं स्वागत केलं होतं.

शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना वंदन केल्यानंतर तिथली माती घेऊन २४ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत जाण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही उद्धव ठाकरे सहकुटुंब २४ नोव्हेंबरलाच अयोध्येला गेले होते. त्यावेळीही त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरील माती नेली होती. तर उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध शरयू नदीवर महाआरती झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशीद वादावर ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल, असा निर्णय दिला. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला.या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत झाले. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत शिवसेना आग्रही आहे. ‘पहले मंदिर फिर सरकार’ असा नाराच उद्धव ठाकरेंनी दिला होता. मात्र आता एनडीएतून शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर होणार, परंतु सरकार ‘महासेनाआघाडी’चे येणार का, हा प्रश्न तिष्ठत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here