उजनीचे पाणी सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही? – सुशीलकुमार शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । ‘जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही?’ असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. लातूरमध्ये आयोजित प्रचार सभेत शिंदे बोलत होते. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे अमित आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या सभा लातूर मध्ये झाल्या. यावेळी शिंदे यांनी उपस्थित जनसमूहाला संबोधित केले.

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उजनी धरणातून ०२ टीएमसी पाणी लातूरला मिळावे यासाठी मोठे प्रत्यन केले होते. मात्र, उजनीच्या पाणी लातूरला मिळू नये म्हणून मोठं राजकारण झाल्याचा खुलासा यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी केला.

तसेच येणाऱ्या सरकारने तात्काळ पाऊलं उचलून लातूरला उजनीचे पाणी लातूरला उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली. लातूर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई असून उजनी धरणाच्या पाण्याची जुनी मागणी लातूरकरांची आहे.

Leave a Comment