हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनने सांगितलं आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिलं असून त्यांची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे. पण हे युद्ध थांबावं यासाठी युक्रेनने भारताकडे मदत मागितली आहे.
रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता हस्तक्षेप करावा. ते प्रभावशाली नेते आहेत. त्यांनी काहीही करून पुतीन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष जेनेंस्की यांच्यात चर्चा घडवून आणावी. मोदींनी या प्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ इगर पोलिखा यांनी केली आहे.
भारताचे रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका निभाऊ शकतं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तात्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसंच आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधण्याची विनंती करणार आहोत,” असं ते म्हणाले आहेत.