हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेल वाल्याने त्यांचा ताफा अडवून त्यांना 2014 सालची उधारी मागितली. भर कार्यकर्त्यांपुढे हॉटेल चालकाने सदाभाऊंशी हुज्जत घातल्याने सदाभाऊ यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्यावर पलटवार करत सदाभाऊ, तुमच्या उधारीचे बिल राष्ट्रवादी काँग्रेस वर का फाडता असा सवाल केला आहे.
उमेश पाटील यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटल, भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना राष्ट्रवादी काँग्रेस वर टीका केल्याशिवाय संधी मिळत नाही. खर तर आमदार असलेल्या आणि मंत्री राहिलेल्या माणसाला एक व्यक्ती उधारीचे पैसे सार्वजनिक ठिकाणी मागतो याचा अर्थ ती व्यक्ती त्रस्त झाल्याशिवाय अस करणार नाही.
सदाभाऊ खोत यांनी 2014 मध्ये माढा लोकसभा मतदार संघातूननिवडणूक लढविली तेव्हा सोलापूरच्या जनतेने त्यांना वर्गणी गोळा करून दिली होती. त्याचप्रमाणे काही कार्यकर्त्यांचे हॉटेल चे जेवणाचे बिल राहील असेल. निवडणुकीत हे अस होत असत , त्यामुळे त्यांनी उमद्या मनाने ते स्वीकारायला हवं. आणि अस काय 5-10 लाख रुपये नव्हते…काही हजारात ती रक्कम असल्याने सदाभाऊ यांनी यामध्ये राजकारण न करता मोठ्या मनाने त्याची उधारी द्यायला हवी होती अस उमेश पाटील यांनी म्हंटल.