सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जत तालुक्यातील बिरनाळ, कंठी, वळसंग, काराजंगी, निगडी इत्यादी परिसरात अनधिकृतपणे कोळसा भट्टीना ऊत आला आहे. वनखाते खात्याच्या आशीर्वादाने या कोळसा भट्ट्या सुरू असल्याची चर्चा आहे दर ५० किलोच्या पोत्यास ३०० रुपये दराने कोकणातील मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. वनखात्याच्या आशीर्वाद जोरात असल्यामुळे अगदी रस्त्याच्या कडेला या कोळसा भट्ट्या सुरू आहेत जत परिसरात तयार होणारा कोळसा कोल्हापूर, सांगली सारख्या शहरी भागात पाठविले जात आहे.
या शहरी भागासाठी कोळसा पाठवणारा एक मोठा ठेकेदार आहे त्याच्या नियंत्रणाखाली या कोळसा भट्ट्या उभ्या राहिल्या आहेत या कोळसा व्यापारातून या ठेकेदारांनी लाखोंची माया गोळा केल्याची चर्चा आहे पण मजूर मात्र थंडीत राबत आहेत. अगदी कडाक्याच्या थंडीत रानात राहून हे मजूर पोटासाठी कोळसा तयार करतात मजुरांचा सगळा संसार उघड्यावर आहे अशा थंडीच्या परिस्थितीमध्ये लहान मुला बाळांसह मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. ना पाण्याची सोय ना निवाऱ्याची सोय अशा कठीण परिस्थितीमध्ये हा संसाराचा बाजार मांडला आहे.