रांची : वृत्तसंस्था – झारखंडमधील धनबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने राहत्या घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ वायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे कि तिचे सासरचे लोक तिचा कशाप्रकारे छळ करतात. या घटनेनंतर महिलेच्या पतीसह सासरचे लोक फरार झाले आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव कोमल पटेल आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी पती अलोक प्रसाद, त्याची आई आणि बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कतरास बाजार येथील रहिवासी उमेश प्रसाद यांनी त्याची मुलगी कोमल हीचे लग्न 2018 मध्ये धनबाद येथील अलोक प्रसादसोबत झाले होते. कोमलच्या घरच्यांनी लग्नात घरउपयोगी वस्तू, दागिने आणि 10 लाख रुपये दिले होते. यानंतर कोमलच्या सासरकडच्यांनी तिला मारहाण करण्यास आणि तिचा छळ करायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी या त्रासाला कंटाळून बुधवारी आत्महत्या केली.
आत्महत्याकरण्यापूर्वी कोमलने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती रडत-रडत आपली व्यथा सांगत आहे. यामध्ये ती सांगत आहे मी आत्महत्या करत आहे. सासरी येऊन मी चूक केली. सॉरी बाबा, मी तुमचं ऐकायला हव होते. मला अस वाटल की, माझा पती आता सुधारला आहे. मात्र, त्याने पुन्हा मला मारहाण करायला सुरवात केली आहे. मरण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या.असे तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. यानंतर कोमलच्या वडिलांनी धनसर ठाण्यात कोमलचा पती, सासू, नणंद यांच्याविरोधात हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.